स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच मालिकेत मनस्विनी आणि तेजस्विनीची मावशी म्हणजेच नंदाची एण्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक नंदा हे पात्र साकारणार आहेत. नंदा अत्यंत खुनशी, स्वार्थी आणि सूडबुद्धीची आहे. पारंपरिक वेशातली, चेहऱ्यावर कृत्रिम माया पण डोळ्यांत कायम हिशोब ठेवणारी नंदा सतत लावणी गुणगुणत असते. नंदा नात्यांना प्रेम आणि आपुलकीच्या मापात न मोजता कायम फायद्यातोट्याच्या तराजूत तोलते. एखाद्याला प्रेमाने जवळ घेत पुढच्याच क्षणी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव ती आखू शकते. समोरच्याची कमकुवत नस नंदाला अचूक पकडता येते. मेलोड्रामा हे तिचं हुकमी शस्त्र आहे. कधी रडते, कधी बेशुध्द पडते, कधी काळजावर हात ठेवत समोरच्याला धडकी भरवते. आज वय झालं तरी तिची महत्त्वाकांक्षा संपली नाही. मनस्विनीसोबत नंदा नेमका कोणता लपंडाव खेळणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका लपंडाव फक्त स्टार प्रवाहवर. Post navigation आई, घराची ‘सीईओ’ आणि आयुष्याची ‘डायरेक्टर’; पाहा तुमच्या आवडत्या अभिनेत्री काय म्हणतात!