‘बिग बॉस मराठी सिझन ६’चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना उत्सुकतेने शिग गाठली आहे. टॉप ५ स्पर्धकांच्या प्रवासाला खास रंगत आणण्यासाठी बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील धुरंधरांची धमाकेदार एन्ट्री झाली. प्रेक्षकांचे लाडके चेहरे पुन्हा एकदा या घरात परतले आणि त्यांनी टॉप ५ सोबत मजा, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष रंगवला. 🔥मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरे, आणि मागील सिझनचे अजून काही धुरंधर येणार आहेत.

यांसारख्या दमदार खेळाडूंनी टॉप ५ सदस्यांना भेटत त्यांच्या खेळावर भाष्य केलं, महत्त्वाचे सल्ले दिले आणि त्यांच्या प्रवासातील काही खास क्षण पुन्हा जिवंत केले. त्यांच्या नजरेत कोण ठरणार या सिझनचा विजेता? कोण आहे त्यांचा आवडता स्पर्धक? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 🤔मेघा धाडेची इच्छा आहे या सिझनची विनर मुलगी व्हावी तिच्या मते तन्वी कोलते किंवा राकेश बापट यामध्ये विनर व्हावा तर पुष्कराच्या मते तन्वी कोलते विनर असेल. शिव ठाकरेची इच्छा आहे विशालने ट्रॉफी उचलावी.

या विशेष भेटीत जुन्या आठवणी, खेळातील अनुभव आणि जिंकण्याच्या रणनीती यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. टॉप ५ स्पर्धकांसाठी ही भेट केवळ मनोरंजन नव्हती, तर अंतिम टप्प्यात स्वतःला अधिक सिद्ध करण्याची एक प्रेरणादायी संधी ठरली.

आता फक्त प्रतीक्षा आहे त्या क्षणाची, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय!पहा ‘बिग बॉस मराठी सिझन ६’चा GRAND FINALE, १९ एप्रिल रात्री ८ वा. आपल्या Colors Marathi वर आणि कधीही JioHotstar वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *