“प्रेम कसे करायचे ते अनेक लोक शिकवतात, मात्र ते प्रेम कसे विसरायचे, हे कोणी शिकवत नाही”. प्रेम कधीही, कुठेही होऊ शकते. प्रेमाला कोणत्या वयाचे बंधन नसते. आवडणारी व्यक्ती आयुष्यातून अचानकपणे निघून जाऊन, अनेक वर्षांनी ती व्यक्ती आपल्या समोर आली तर पुढे काय होईल? याची रंजक गोष्ट “तुला पाहता” या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘तुला पाहता’ हा चित्रपट ७० च्या दशकापासून ते आजच्या काळापर्यंतच्या तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतो.

या चित्रपटातील १९७० चे दशक हे त्या काळातील वेशभूषा, एकूणच वातावरण आणि संगीताच्या बाबतीत एक वेगळेपण दर्शवते; जे प्रेक्षकांना थेट १९७० च्या दशकात घेऊन जाते. चित्रपटातील आजचा काळ हा ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि ‘पिढ्यांमधील अंतर’ यांसारख्या समकालीन सामाजिक मुद्द्यांना हाताळतो.

प्रत्येक अनोख्या कथेची सुरुवात एका नव्या दृष्टिकोनातून होते. एका नव्या युगाला एका नव्या प्रकारच्या ऊर्जेची गरज असते आणि ती मानसी पाटील आणि नचिकेत लेले मध्ये पाहायला मिळेल. ह्या चित्रपटात तुम्हाला सतीश पुळेकर, इला भाटे ही जोडी हि पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळेल . या चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री इला भाटे, नचिकेत लेले, मानसी पाटील, यांच्यासह निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी “तुला पाहता” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन ही मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून १० जुलैला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचं पोस्टरही लक्षवेधी असून सहकुटुंब पाहता येणाऱ्या “तुला पाहता” चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.चला तर मग, “तुला पाहता” बघायला सहकुटुंब लवकरच भेटूया जवळच्या चित्रपटगृहात !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *