लोअर परळ येथे शेलार मामा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला यंदा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात सुरुवात झाली. या नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या नवचंडी याग-यज्ञ सोहळ्याला विशेष महत्त्व असून या पवित्र सोहळ्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी उपस्थित राहून देवीची मनोभावे पूजा केली. पारंपरिक विधी, मंत्रोच्चार आणि धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या यज्ञाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या नवरात्रोत्सवाला अनेक भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि नवचंडी याग-यज्ञात सहभाग घेतला. श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. “नवरात्रोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे. अशा पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक आहे, असे तेजस्विनी ह्यावेळी म्हणाली.. Post navigation ‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ विचार करायला भाग पाडणारी नाट्यकृती चर्चेत! ‘अप्सरा’बनली ‘मंजुळा’!