भारतातील अग्रगण्य कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाउस ‘झेड’ यांनी आज ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ या नवीन समाधानाची सुरुवात केल्याची घोषणा केली. मल्टी-स्क्रीन एंगेजमेंटसह मार्ग काढत सर्जनशील पद्धतीने लक्ष वेधून घेण्यासाठीचे हे एक अभिनव ओम्नी-चॅनल पोहोच समाधान आहे.जाहिरातदारांसमोरचे आव्हान, प्रभावाशिवाय उपलब्धता,भारतीय जाहिरात क्षेत्रात मोठे नाट्यमय बदल झाले आहेत. माध्यमांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे कोणत्याही आकाराच्या ब्रँड्सना अगदी तेवढ्याच सहजतेने जाहिरातींची खरेदी करता येते, परंतु या लोकशाहीकरणामुळे एक नवे आव्हान उभे राहिले आहे आणि ते म्हणजे: जाहिरातींच्या प्रचंड गर्दीतून उठून दिसणे.लक्ष देण्याची क्षमता (अटेंशन स्पॅन) दिवसेंदिवस कमी होत असून जाहिरातींची गर्दी वाढत आहे आणि मार्केटर्ससमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. केवळ दिसण्यापासून खऱ्या अर्थाने लक्षात राहण्यापर्यंतचा प्रवास कसा साधायचा? केवळ ब्रँडबद्दलची जागरूकता न वाढवता, त्याचवेळी ब्रँडबद्दलचे प्रेम आणि कृती दोन्ही कशा निर्माण करू शकतो? ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ बद्दल माहिती- जिथे व्यक्तिरेखेला प्राधान्य देणारे कथाकथन आणि व्यावसायिक प्रभाव एकत्र येतात. ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ हे या आव्हानावरील ‘झेड’ चे उत्तर आहे — व्यक्तिरेखेला प्राधान्य देणारा आणि मूमेंट-ड्रिव्हन असा हा मीडिया फॉर्मॅट नैसर्गिक कथाकथनाला व्हायरल एंगेजमेंटमध्ये आणि मोजता येणाऱ्या ब्रँड इक्विटीमध्ये रूपांतरित करतो.ग्राहकांच्या अनुभवात व्यत्यय आणणाऱ्या पारंपारिक जाहिरात फॉर्मॅट्सच्या उलट ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ ब्रँड्सना प्रेक्षकांना आधीपासूनच आवडत असलेल्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या जुळणाऱ्या कथानकांमध्ये सहज गुंफतात. देशातील लाखो घरांमध्ये ओळखीचे चेहरे बनलेल्या ‘झेड’च्या विश्वासार्ह टेलिव्हिजन व्यक्तिरेखांचा वापर करून हे समाधान ब्रँड इंटिग्रेशनला नैसर्गिक बनवते आणि त्यामुळे ते जबरदस्तीने केले असल्यासारखे वाटत नाही, तर सहजपणे कथेत मिसळलेले भासते. ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’चे चार प्रमुख स्तंभ:1. व्यक्तिरेखेवर आधारित प्रामाणिकता: ‘झेड’च्या लोकप्रिय व्यक्तिरेखा (दिलफ्लुएन्सर्स) सांस्कृतिक प्रेरक म्हणून काम करतात आणि ब्रँड संदेशांना हायपरलोकल ते राष्ट्रीय पातळीवरील संदर्भांमध्ये विश्वसनीयता आणि भावनिक जोड देतात. 2. टीव्ही-मधून निर्माण होणारा विश्वास: हे मूमेंट्स सर्वप्रथम ग्राहकांचा सर्वाधिक विश्वास आणि ओळखीच्या टेलिव्हिजन या माध्यमावर निर्माण होतात आणि त्यानंतर नैसर्गिकरित्या डिजिटल, सोशल आणि क्रिएटर इकोसिस्टम्सपर्यंत विस्तारतात. 3. नैसर्गिक (ऑर्गेनिक) व्हायरॅलिटी: कथानकातील संकेतांना शेअर करता येण्याजोग्या सांस्कृतिक संकेतांमध्ये रूपांतरित करून ब्रँड्स जबरदस्तीच्या एक्स्पोजरऐवजी खरी एंगेजमेंट मिळवतात.4. प्लॅटफॉर्म-अॅग्नॉस्टिक स्केल: टेलिव्हिजन, डिजिटल, सोशल मीडिया आणि क्रिएटर नेटवर्क्सवरील सलग वितरणामुळे सातत्यपूर्ण संदेशासह ब्रँड्सना जास्तीत जास्त पोहोच मिळते.केस स्टडी: “तुमहोलव्हली” कॅम्पेनहा उपक्रम राष्ट्रीय कन्या दिनी “जब लाईफ को लेती हो लाईटली तो लगती हो और भी लव्हली” या कॅम्पेन संदेशासह सुरू झाली. व्यक्तिरेखेला प्राधान्य देणाऱ्या मूमेंट्स ‘झेड’च्या हिंदी आणि मराठी शोजमध्ये सहज गुंफून या मूमेंट्स नैसर्गिकरित्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रवास करत गेले आणि क्रिएटर व कम्युनिटीच्या सहभागातून लाखो संभाषणे आणि इम्प्रेशन्स निर्माण झाली. सान्या मल्होत्रा यांना घेऊन तयार केलेल्या ब्रँड फिल्मने हे कथानक अधिक दृढ केले आणि टीव्हीचे नेतृत्व असलेले सांस्कृतिक संकेत खऱ्या व्हायरॅलिटीमध्ये आणि अर्थपूर्ण ग्राहक एंगेजमेंटमध्ये कसे रूपांतरित होतात हे प्रभावीपणे दाखवून दिले. नवीन मीडिया फॉर्मॅट ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ चा दृष्टीकोन बरोबर असल्याचे या कॅम्पेनने सिद्ध केले की व्यक्तिरेखेला प्राधान्य देणारे आणि कंटेंटचे नेतृत्व असलेल्या कथाकथनामुळे मोठ्या प्रमाणावर एंगेजमेंट मिळाली: • इम्प्रेशन्स: +25 मिलियन – टीव्ही, झी5, डिजिटल अशा अनेक प्लॅटफॉर्म्सवर प्रचंड प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोच झाल्याचे दर्शवते. • संभाषणे: +1k – उच्च दर्जाची एंगेजमेंट आणि अर्थपूर्ण प्रेक्षक सहभाग दर्शवते. • एंगेजमेंट: 2.5 मिलियन – संदेशांसोबत ग्राहकांची झालेली खोल जोड दाखवते. • क्रॉस-प्लॅटफॉर्म व्हेलॉसिटी: हे कॅम्पेन 24 तासांच्या आत टेलिव्हिजनवरून नैसर्गिकरित्या डिजिटल सोशल प्लॅटफॉर्म्स, व्हॉट्स अॅप फॉरवर्ड्स आणि वास्तविक संभाषणांपर्यंत प्रवास करत गेले. झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेडच्या अॅडव्हर्टाईजमेंट रेव्हेन्यू, ब्रॉडकास्ट अँड डिजिटलच्या प्रमुख लक्ष्मी शेट्टी म्हणाल्या:“जसे ग्राहक व्यत्यय आणणाऱ्या कम्युनिकेशनपासून दूर जात आहेत, तसे जाहिरातदारांना अशा मूमेंट्सची गरज आहे जे सांस्कृतिकदृष्ट्या कमावलेले आणि भावनिकदृष्ट्या प्रामाणिक वाटतात. दिलफ्लुएन्सर मूमेंट्स हा मार्केटर्ससाठीचा नवीन मीडिया फॉर्मॅट आहे. व्यक्तिरेखेला प्राधान्य देणारा कंटेंट सिस्टिम्सच्या माध्यमातून हा फॉर्मॅट मोठ्या प्रमाणावर पोहोच देतो आणि विविध प्लॅटफॉर्म्सवर सहजपणे प्रवास करत प्रेक्षकांशी वैयक्तिक स्तरावर जोड निर्माण करतो. दिलफ्लुएन्सर मूमेंट्सच्या माध्यमातून आम्ही जाहिरातदारांना सांस्कृतिक मुळांशी रूजलेल्या कथाकथनाला प्लॅटफॉर्म-अॅग्नॉस्टिक वितरण आणि ‘झेड’च्या नॅशनल स्केलच्या जोरावर ब्रँडबद्दल प्रेमामध्ये रूपांतरित करण्यास सक्षम करत आहोत. ”झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव म्हणाले:“भारतीय जाहिरात बाजार सातत्याने विस्तारत आहे, केवळ आकारमानात नाही, तर उपलब्धतेतही. आज 100 मिलियनचा ब्रँड आणि 10,000 मिलियनचा ब्रँड, दोघेही समान सहजतेने इम्प्रेशन्स खरेदी करू शकतात. सुमारे अर्ध्या, म्हणजेच 1 लाख कोटींच्या जाहिरात बाजारातील मोठा हिस्सा लिनीअर आणि डिजिटल डिव्हाईसेसवरील व्हिडिओमधून येत असल्याने फक्त ‘अॅक्सेस’ ही आता काही आघाडी राहिलेली नाही; खरा फरक ‘अॅफिनिटी’ (जिव्हाळा) निर्माण करण्यात आहे. कथाकथन, ओळखीच्या व्यक्तिरेखा आणि आपल्याशा वाटणाऱ्या जगातून आणि विविध स्क्रीन्सवर प्रेक्षकांच्या मनात ठसणाऱ्या मूमेंट्समधून जिव्हाळा निर्माण होतो. याच ठिकाणी ‘झेड’च्या ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ बदल घडवू शकतात. माध्यमांची निवड अजूनही प्लॅटफॉर्म-आधारित पद्धतीने होते, परंतु एक मूमेंट अनेक प्लॅटफॉर्म्सवर आडव्या पद्धतीने नैसर्गिकपणे (ऑर्गेनिक) आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर प्रवास करू शकतो. आमच्या पोहोचेच्या जोरावर, आमच्या दिलफ्लुएन्सर्सच्या ताकदीवर आणि आमच्या कथाकथनाच्या भावनिक इक्विटीवर, आम्ही ब्रँड्सना प्रेक्षकांना आधीपासूनच आवडत असलेल्या मूमेंट्समध्ये अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी सक्षम करत आहोत. ”मार्केटर्ससाठी महत्त्वाचा निष्कर्षअशा जगात, जिथे कुणीही पोहोच खरेदी करू शकतो, पण फक्त योग्य कथाच मनात घर करतात, तिथे ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ मार्केटर्सना एक सुसंगत आणि मोठ्या प्रमाणावर विस्तारता येणारे इकोसिस्टिम देते जे:• त्यांच्या ब्रँड्सना सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मूमेंट्समध्ये नैसर्गिकरीत्या गुंफते. • खऱ्या व्हायरॅलिटीकडे नेणारी नैसर्गिक एंगेजमेंट प्रदान करते. • अनेक प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात वितरण उपलब्ध करून देते. • मिळणारे लक्ष टिकाऊ ब्रँड प्रेम आणि भावनिक इक्विटीमध्ये रूपांतरित करते. Post navigation “बिग बॉस मराठीच्या घरातून राधा पाटीलची EXIT ! “क्लाऊलिंग” कलेची नवी परिभाषा !