स्टँडअप कॉमेडी हा विषय सध्या चर्चेत असला तरी आपल्याकडे अनेक धम्माल आणि उत्कृष्ट स्टँडअप कॉमेडीयन आहेत मग ते विवध भाषांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना आपल्याला बघायला मिळतात आणि यातल हे महत्वपूर्ण नाव म्हणजे कॉमेडियन मंदार भिडे ! हसवून विनोद करून प्रेक्षकांचं लक्ष वेधून सोप्पं आहे असं अनेक जण आपसूक बोलून जातात पण या मागची खरी गंमत या स्टँडअप करणाऱ्या कलाकारांना माहीत असते. आज असलेल्या जागतिक हास्य दिनाच्या निमित्तान मंदारने त्याचा आयुष्यात असलेलं हास्याच महत्त्व अधोरेखित केलं आहे. तो सांगतो “हास्य हा सगळ्यांचा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि माझ्यासाठी हास्य फार महत्त्वाचं आहे लोकांना रडवण सोप्पं असतं पण या उलट हसवण खूप कठीण काम आहे असं मला वाटतं. देवाच्या कृपेने मला लोकांचं हसून खळखळून मनोरंजन करण्याची संधी मिळाली आहे. स्टँड अप करत असल्याने माझं हे काम आहे आणि आपला प्रेक्षकवर्ग हा स्टँडअप शो ला येऊन थोडा वेळेसाठी सगळा स्ट्रेस विसरून मनमुराद हसतो हे बघून फार बरं वाटतं”कॉर्पोरेट जगातील गडगंज पगाराची नोकरी सोडून फुल्ल टाईम विनोद करण्याचा धाडसी निर्णय असो किंवा आज त्याचा शो ला होणारी हाऊसफुल्ल गर्दी असो प्रेक्षकांना हसवून विनोद करणं तेवढं सोप्प नक्कीच नाही असं देखील मंदार सांगतो. “हास्य” हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि हसून प्रेक्षकांना मोहित करणं ही कला आजवर अनेक स्टँडअप कॉमेडियनने अगदी लीलया पार पाडली आहे. Post navigation ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर डंका! ‘दृश्य-अदृश्य’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण!