आजवर जिने प्रेक्षकांच निखळ मनोरंजन केलं आणि आता ती नव्या रुपात पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून अशी नृत्यांगना गौतमी पाटील हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या गाण्यांमधून प्रेक्षकांना मोहित केलं आहे.आजवर रसिक प्रेक्षकांनी कधी ही न पाहिलेले तिचे खास लूक यातून बघायला मिळाले एवढं नाही तर गौतमीने या गाण्यासाठी खूप सुंदर मॉर्डन लूक केले आहेत.

तिच्या नेहमीच्या पारंपरिक मराठमोळ्या लूक पेक्षा या गाण्यातील तिचे लूक चर्चेचा विषय ठरले आहेत.महाराष्ट्राची मोरनी गौतमी पाटील आणि तिचा तू मोरनी गाण्यामधला लूक तिच्या अदा सगळंच खूप लक्षवेधी आहे या गाण्याबद्दल बोलताना गौतमी सांगते “आजवरच्या माझ्या लूक मधला या गाण्यामध्ये असलेले सगळेच लूक खूप वेगळे मॉर्डन होते. या वेळी गाणं करताना थोडं दडपण आणि धाकधूक देखील होती कारण मॉर्डन लूक मध्ये मी पहिल्यांदा परफॉर्म केलं आहे आपला नवा अंदाज प्रेक्षकांना किती आवडेल याची शंका होती पण गाणं आल्यापासून खूप छान प्रतिक्रिया येतात आणि यातून अजून असे नवनवीन लूक करण्याचा आत्मविश्वास मिळतोय.

“तू मोरनी” मध्ये नटखट अंदाजात दिसलेली गौतमी आता पुढे अजुन कोणत्या नव्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *