स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ प्रेक्षकांच्या मनात दिवसेंदिवस अधिक घट्ट स्थान निर्माण करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांची भावनिक गोष्ट प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. लवकरच मालिकेत एक अत्यंत खास आणि भावनिक टप्पा येणार आहे. पार्थ आणि काव्या लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर येणा आहे. प्रत्येक नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि सुंदर प्रवास असतो, आणि मालिकेतही याच प्रवासाची सुरुवात होणार आहे.या नव्या वळणाचा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अवघ्या २४ तासांत या प्रोमोने ५ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम रचला आहे. सोशल मीडियावरही या प्रोमोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पार्थ-काव्याच्या या नव्या प्रवासासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.प्रेक्षकांकडून मिळणारं भरभरून प्रेम हे प्रत्येक कलाकारासाठी खूप खास असतं. या प्रतिसादामुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची संपूर्ण टीम आनंद व्यक्त करत असून, मालिकेत येणारं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. Post navigation आनंदीने दृष्टीहीन मुलांसोबत इंद्रधनुष्यात भरले आनंदाचे रंग! मनोरंजनाचा पॉवर-प्ले, झी मराठीवर मालिकांमध्ये नवा सामना सुरू!