तारिणी आणि केदार यांचा अखेर लग्नसोहळा रंगणार आहे आणि लग्नाचे सर्व सोहळे मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. पण तारिणीच लग्न असल्यामुळे हे साधं-सोपं नक्कीच नसणारे. या लग्नात भरपूर ड्रामा, थरार आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत.तारिणी आणि केदारच्या लग्नात युवराजने एक मोठा प्लॅन रचला आहे. त्यासाठी तो बापुराव जामखंडेना भेटतो आणि ते ठरवतात की इथे लग्न नाही, तर सुतक लागलं पाहिजे. लग्नाचा पहिला सोहळा म्हणजे मेहंदी, जिथे इशा आणि निशी तारिणीच्या मेहंदीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्नात आहेत. पण ते यशस्वी होतील? तारिणी-केदारच्या लग्नसोहळ्यात टीम तारिणीही पोहोचली आहे. आणि ते ही वेगळ्या रूपात, कोणी फोटोग्राफर, कोणी इव्हेंट मॅनेजमेंट, तर कोणी कॅटरिंगमध्ये आहे. मेहंदीचा घोळ सुरू असतानाच दुसरीकडे कौशिकीच्या रूममध्ये कोणीतरी जीवघेणा गॅस सोडला आहे. पण त्या रूममध्ये कौशिकी ऐवजी तारिणी आहे. इथेच तारिणी ला कळणार आहे की हा सगळा कौशिकीला मारण्यासाठीचा प्लॅन आहे. तर संगीत सोहोळ्यात, जिथे टीम तारिणी आता सतर्क झाली आहे. संगीत मध्ये घरातील सगळे डांस करणार आहेत. सुमी आज्जी ‘सामी-सामी’ गाण्यावर परफॉर्म करणार आहे, तर काव्या आणि नमाचा डांसही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. *संगीत सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर यांचा धमाकेदार परफॉर्मन्स* . ललित कौशिकीचा खास पाहुणा म्हणून तारिणी-केदारला शुभेच्छाही देणार आहेत. यासोबतच केदार आणि तारिणीचा टॉर्च लाईटमध्ये खास डांस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.संगीत आणि हळदीमध्येही कौशिकीवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न होतोय. तर आता लग्नाचा दिवशी तारिणी गौरीहार पूजायला बसलेली असताना तिला कळत की कौशिकी किडनॅप झाली आहे. ड्युटी फर्स्ट विचार असलेले तारिणी आणि केदार लग्नाच्या कपड्यांमध्येच कौशिकीला वाचवण्यासाठी निघालेत. तसेच डोलीतून होणारी तारिणीची धडाकेबाज एंट्री प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. Post navigation शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने! राणादा अडकला ‘ट्रॅप’मध्ये!