‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी टाकते की जसा ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही केलं पाहिजे. अधिरा एक खास प्लॅन आखते आणि समर, स्वानंदी व रोहनला तातडीने एका ठिकाणी पोहोचायला सांगते. तिथे पोहोचल्यानंतर कळतं की ही व्हॅलेंटाईन पार्टी आहे. या पार्टीमध्ये समर-स्वानंदीचे खास रोमँटिक क्षण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. मात्र, या आनंदातही मल्लिका मीठाचा खडा टाकायची योजना आखते.

आता रोहन हे सगळं सहन करणार का? मल्लिकाचा प्लॅन यशस्वी होणार का ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दुसरीकडे *‘तारिणी’* मालिकेत टीम तारिणी केदारला चिडवते की व्हॅलेंटाईन डे असूनही तो तारिणीसाठी काही खास करत नाहीये. सरप्राईझ म्हणून केदार टेडी घेऊन येतो. पण चुकून ते गिफ्ट काव्याजवळ जातं आणि केदारचा व्हॅलेंटाईन डे गोंधळात सापडतो. या फसलेल्या सरप्राईज नंतर कौशिकी, युवराज-निशी आणि तारिणी-केदार यांना एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी पासेस देते. तिथे परफेक्ट व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनची तयारी केलेली असते.दोन्ही जोडपी तिथे पोहोचतात त्यांचा खास रोमँटिक डान्स होतो, मजेदार गेम्स खेळले जातात.

या खेळात केदार आणि तारिणीमध्ये जवळीक निर्माण होते. मात्र अचानक तारिणी केदारला दूर ढकलते जे पाहून निशी ऐकून आश्चर्यचकित होते.*तारिणी नेमकं काय बोलते? त्याचा परिणाम काय होणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका व्हॅलेंटाईन खास सप्ताह ‘वीण दोघातली ही तुटेना’ सायं. ७:३० वा. आणि ‘तारिणी’ रात्री ९:३० वा. झी मराठीवर.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *