गायक रोहित राऊतनं आजवर अनेक चित्रपटांतून हिट गाणी गायली आहेत. आता रोहित त्याचा सिंगल म्युझिक व्हिडिओ घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. “डीपी झूम करून असे ट्रेंडी शब्द असलेल्या या गाण्याचं पोस्टर लाँच नुकतेच अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

जयंग गंगणे, स्वरूप स्टडिओज प्रस्तुत “डीपी झूम करून” या गाण्याची निर्मिती जयंत गंगणे, सचिन नारकर, विकास पवार यांनी निर्मिती केली आहे. आजवर अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती स्वरूप स्टडिओज यांनी केली आहे. राहुल ढेंगळे यांच्या गीताला विकी अ़डसूळे यांनी स्वरसाज चढवला आहे. संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन,  नैनेश डिंगणकर यांनी संकलन, जिज्ञासा पेनूरकर यांनी वेशभूषा, अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्मिती केली आहे. 

“डीपी झूम करून” या शब्दांना गुलाबाच्या फुलांनी वेढले आहे. तसेच एक तरुण-तरुणी सायकलवर आहेत. गाण्याच्या पोस्टरवरून हे गाणं युथफुल, रोमँटिक असल्याचं जाणवतं. आजवर रोहित राऊतनं अनेक रोमँटिक गाणी गायली  आहेत. त्यामुळे डीपी झूम करून हे गाणं रोहितच्या आजवरच्या गाण्यांपेक्षा किती वेगळं ठरतं याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता लवकरच हे गाणं आपल्या भेटीस येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *