मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे *‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’* . यंदा हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. *“मराठी गाजलंच पाहिजे”* या विशेष थीमवर आधारित या वर्षीच्या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा ठसा, परंपरेचा अभिमान आणि आधुनिकतेची सुंदर सांगड अनुभवायला मिळाली. संपूर्ण मंचावर मराठीचा आवाज घुमला आणि मराठी कलेचा सन्मान अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत अनेक मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.*ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर – दशावतार सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – दिग्दर्शन – संतोष डावखर – गोंधळ सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – अभिनेत्री – नंदिनी चिकटे – स्थळ, साजिरी जोशी – एप्रिल मे ९९ सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – अभिनेता – तारानाथ खिरटकर – स्थळ सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – ललित प्रभाकर, हृता दुर्गुळे MOST WATCHED ORIGINAL SERIES ON MARATHI Z5 – दशावतार सर्वोत्कृष्ट चित्रपट – आता थांबायचं नाय ! सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता सुभाष – जारण सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – शिवराज वायचळ – आता थांबायचं नाय ! सर्वोत्कृष्ट अभिनेता – दिलीप प्रभावळकर – दशावतार, भरत जाधव – आता थांबायचं नाय ! सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धार्थ जाधव – आता थांबायचं नाय ! यंदाच्या सोहळ्यात “आता थांबायचं नाय !” आणि “दशावतार” या चित्रपटांनी विशेष लक्ष वेधले. विविध श्रेणींमध्ये या चित्रपटांचा सन्मान करण्यात आला. झी चित्रगौरव पुरस्कार २०२६ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून मराठी संस्कृतीचा, परंपरेचा आणि कलेचा उत्सव ठरला. “मराठी गाजलंच पाहिजे” हा संदेश अधिक ठामपणे देत हा सोहळा प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला. मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विश्वास या सोहळ्याने पुन्हा एकदा दृढ केला. तेव्हा बघायला विसरू नका हा भव्य सोहोळा शनिवार १४ मार्च संध्या. ७ वा सदैव तुमच्या झी मराठीवर. Post navigation मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट घेऊन येणारी -‘लाडकी विहीण योजना’ महेश मांजरेकरांच्या हस्ते “डीपी झूम करून” गाण्याचं पोस्टर लाँच!